न झालेली भेट


 
संध्याकाळची वेळ झाली होती, ऑफिसमधून बाहेर पडण्याची वेळ झाली होती. घड्याळ पाहिले तर सात वाजले होते. रोजच्या सारख्या धावपळीच्या दिवसानंतर घरी जाण्याची वेळ झाली होती. मी मोबाइल उचलून पाहिले आज बायकोचा मेसेज आलेला नव्हता. “चला, आज काम संपलंय, घरी जाऊन थोडं विश्रांती घेऊ,” असा विचार मनात आला.. पाऊस पडायचा अंदाज होता, म्हणून आता लगेच निघायला हवं!.

मी बॅग घेतली आणि खाली पार्किंगकडे निघालो. जिथे नेहमी माझी बाइक लावलेली असते, आज ती जागा रिकामी होती. दुसरी कोणतीही बाइक तिथे नव्हती. थोडा शोध घेतला, पण काहीच दिसले नाही. मग दिसली बाइक एका कोपऱ्यात. मग मी गेला आणि बाइक घेतलीआणि संध्याकाळच्या थंड हवेत रस्ता पकडला. वातावरण ताजेतवाने आणि थंडसर होतं; हलक्या थेंबांनी ओलेले रस्ते, वारा, थोडं सावल्या आणि हलकासा धुकं सगळं नैसर्गिकचं शांततेत झुलत होतं.रस्त्यावर पाहिलं, एक भाजीवाला गरम-गरम भजी काढत होता. वा वा! या वातावरणात गरम भजी तर नक्कीच पाहिजे. घरी गेल्यावर बायकोला सांगितलं, “आज गरम भजी कर!”

रस्त्यात थोडं पुढे गेल्यावर रोजच्या ट्रॅफिकमध्ये अडकून थोड्या अंतरावर आलो. अचानक जोरात पाऊस सुरू झाला. सारे लोक अडोशा शोधत जिकडे तिकडे गेले. रेनकोट घालून रस्त्यावरच थांबले. मी एका दुकानाजवळ गेलो. बाहेर पाऊस लागला , गारदी जास्त असल्यामुळे मी थोडी वाट काढत आतमध्ये गेले, जेणेकरून पाऊस लागणार नाही. माझं लक्ष एका दुकानाकडे गेलं जिथे गॅस लाइट्स आणि सजावट एकदम आकर्षक वाटत होती. दुकानाजवळ थोडी गर्दी होती.

थोड्या अंधारात पाहिले, समोर एक ओळखीचा चेहरा. एक मुलगी शांत बसलेली, गळ्यात मंगलसूत्र बांधलेले, चेहऱ्यावर सौम्य हास्य, आणि माझ्या मनाला नेहमीसारखा ठाव लागलेला. त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं

आज किती वर्षं झाली, ते आठवत नाही. मी काही कुठल्या चित्रपटातला शाहरुख खान नाही, ६ वर्ष, ७ दिवस, १२ मिनिटं… पण आजही ती लक्षात आहे. आजही तिला पाहून, हे जग थांबलेलं वाटत होतं.

ती एक मुलगी, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं, मला माहीत नव्हतं. आज बाजूला काय चाललंय, मला फक्त हरवलेलं वाटत होतं तिच्या आठवणींत. माझ्या आठवणीत काय झालं होतं… एवढं प्रेम होतं, एवढी काळजी होती. आजही तिला माझ्या आठवणीत येतं असेल का?

जो माझा हाल आहे, त्याचा तिच्यावरही काही परिणाम झाला आहे का? काय झालं, तिला अचानक लग्न ठरलं. तिने किती समजावलं, घरी बोललं… पण माझ्या घरी काय परिस्थिती होती, मला माहीत होतं. तिला ही माहीत होतं. दोघांना माहीत होतं… हे नक्कीच होतं मिलना किस्मत में नहीं लिखा. तरीही प्रेमाला कोण रोखू शकतं?

"आ ही जाता है जिस पे दिल आना होता है"

रोज भेटणारे, आम्ही नेमके… मी घरी, ती पुण्यात. भेट नाही झाली, काहीही नाही. मला माहीत होतं की समोर काही होणार नाही. हे आम्हाला माहीत होतं. आणि तिचा साखरपुडा झाला. सगळं जग संपलं.तीचं चूक होती ती थांबली नाही, की माझी होती मी तिला थांबवू शकलो नाही ती गेली, पण चूक कोणाचीही नव्हती. परिस्थिती होती. ती दोघांनाही माहीत होतं. पण आता उपयोग काय? तिचा साखरपुडा झाला, आणि आमची बोलणी थांबली. शेवटचा कॉल कधीही झाला नाही.

एकच खंत राहिली ती शेवटची भेट कधी झालीच नाही.… मी फक्त तिला पाहत होतो. आणि जाणवलं, सगळं निघून गेलं.आणि जाणवलं, सगळं निघून गेलं… मी एकटाच होतो, समोर पाहिलं. पाऊस थांबला होता. अरे, पाऊस थांबला! चला, बायको ला आज कांदा भाजी करायला सांगायला पाहिजे.


Comments

Popular posts from this blog

शेवटचा फोन

मीच परत आलोय… पण मी नाही

जागृत भय - भाग 1