Posts

शिखंडी

Image
आज युद्धाचा दहावा दिवस संपला होता… सूर्य बराच आधी अस्ताला गेला होता, पण कुरुक्षेत्र अजूनही झोपलेलं नव्हतं. क्षितिजावर उरलेला केशरी प्रकाश काळ्या अंधारात विरघळत होता, आणि त्या मंद प्रकाशात रणभूमीचं भयानक रूप अधिक स्पष्ट दिसत होतं. माती… ती आता माती उरलीच नव्हती. ती लाल झाली होती  रक्ताने, घामाने, आणि हजारो अपूर्ण स्वप्नांनी. कुठे रथांच्या चाकांनी खोल खोल खाचा पडलेल्या, कुठे घोड्यांच्या टापांनी जमीन फाटलेली, आणि कुठे तलवारींच्या वारांनी उडालेली धूळ अजून हवेत तरंगत होती. जिथे सकाळी रणशिंग वाजलं होतं, जिथे हजारो रथ विजेसारखे धावत होते, जिथे वीरांच्या गर्जना आकाश फाडत होत्या… तिथे आता फक्त एक विचित्र, अंगावर काटा आणणारी शांतता पसरली होती. पण ती शांतता मृत नव्हती… ती जिवंत होती  वेदनेने, आक्रोशाने, आणि शेवटच्या श्वासांच्या आवाजाने. जिकडे तिकडे जखमी सैनिक पडले होते. कोणाचा हात तुटलेला, अजूनही तलवारीची मूठ घट्ट पकडलेली… कोणाच्या छातीत बाण घुसलेला, आणि प्रत्येक श्वासासोबत रक्त बाहेर येत होतं… कोणीतरी डोळे उघडे ठेवून आकाशाकडे पाहत होता जणू शेवटचा प्रश्न विचारत होता: “हे सगळं कशासाठी?” क...

जागृत भय - भाग 1

Image
  कोमल, वय २६ वर्षे, एका लहानशा शहरातून आली होती.  मध्यमवर्गीय घर, मर्यादित साधनं, आणि स्वप्नांना सतत चिमटे काढणारी वास्तवाची टोचणी हे सगळं तिच्या बालपणापासून तिच्या सोबतीला होतं.आई-वडीलांवर आणि लहान भाव-बहिणीवरची काळजी घेणं तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. म्हणूनच, कोमल नेहमी स्वतःला प्रेरित करत असे“घराला आधार द्यायचा असेल, घरच्यांची परिस्थिती सुधारायची असेल, तर मला कष्ट करावेच लागतील.” खूप मोठी स्वप्नं मनाशी बाळगून ती पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात आली. इथे येणं म्हणजे तिच्यासाठी फक्त नोकरी मिळवणं नव्हतं तर घरच्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणण्याची ही शेवटची वचनबद्ध धडपड होती. पुण्याच्या गर्दीतून चालताना तिच्या पावलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असायचा. जणू ती स्वतःला नव्याने सिद्ध करायला निघाली होती.बघता बघता तिने नोकरी मिळवली आणि आज तिला ही नोकरी करत पाच वर्षे झाली आहेत . काम तिच्यासाठी फक्त जबाबदारी नव्हतं ते तिचं शस्त्र होतं, तिची ताकद, आणि तिच्या स्वप्नांच्या लढाईतील सर्वात मोठा साथीदार. थकवा तिचा पाठलाग करायचा, अडचणी तिचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करायच्या, कधी परिस्थिती त...

मीच परत आलोय… पण मी नाही

Image
 आभासपूर साताराजवळील एका पर्वतरांगेच्या कुशीत वसलेलं, साधं पण वेगळं गाव. माणसांची गती हळू, रस्त्यांवर फक्त मातीला ओलेपणाची वास व पावसाच्या थेंबांचा आवाज जाणवतो. या ऋतूत, मोसम जसे कधीही पावसाला सुरुवात करेल, तसंच गाव हिरव्यागार रंगात लपून जातं. पाखरांचा किलबिलाट, ओल्या मातीचा वास, आणि पाण्याने भरलेल्या खळखळत्या नाल्यांचा आवाज सगळं काही जणू गावाला जीव देत असे. गावाच्या बाहेर पर्वतावरून येणारा वारा झाडांच्या पानांना हलवत असे, आणि गवताच्या प्रत्येक कड्यावर थेंब जणू मोत्यासारखे चमकत असत. गावाच्या पल्याड, अरुंद रस्त्याने जात एक जुनी रासीकामाची कारखाना होती तुटलेल्या काचांनी आणि धुळीच्या थरांनी वेढलेली. जवळपास पन्नास लोक तिथे काम करीत होते, आणि प्रत्येकाचा स्वतःचा एकच ठराविक दिनक्रम होता. त्यात अभिषेकही होता, २७ वर्षांचा, पण त्याच्यासारखा गावात कोणीही नव्हता. अनाथ, तो आपल्या छोट्या घरात एकटाच राहत असे घर गावापासून थोडेसे अंतरावर, झोपड्या व घाणीकचऱ्यापासून दूर, जणू त्याने स्वतःसाठी एक छोटासा, सुरक्षित विश्व उभा केलेला होता. अभिषेक खूप अंतर्मुख होता. कारखाना तो हळूच येत-जाई, सहकर्मचा...

शेवटचा फोन

Image
अमितच्या आयुष्यातील एक दिवस, दुसऱ्यांसारखा सामान्य दिवस नव्हता. सकाळपासूनच ऑफिसमध्ये कामाचा ढिगारा त्याच्यावर पडला होता. त्याच्या डेस्कवर स्टॅक केलेल्या फाइल्स, कागदपत्रे, आणि नोटबुक्स जणू त्याच्यावर उंच दगडांची तांदळवत होती. स्क्रीनवर चालणाऱ्या प्रेझेंटेशनची स्लाइड्स, इमेल्सची पंक्ती, आणि लगातार येणारे कॉल्स प्रत्येक मिनिटात त्याला निर्णय घ्यावे लागायचे. हाताखाली कंप्युटरचे कीबोर्ड, फाइल्स, डोळ्यांसमोर स्क्रीन सगळं एकमेकात गुंफलेलं, आणि तो त्यात बुडलेला. त्याच्या बाजूला सहकारी बसलेले होते, प्रत्येकजण स्वतःच्या कामात बुडला होता. काही लोक फोनवर बोलत होते, काही लोक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत होते, काहीजण आपल्या लॅपटॉपवर कोड लिहीत होते. ऑफिसमध्ये हलकी वातानुकूलनाची गूंज, कॉफी मशीनचा आवाज आणि कधीकधी खिडकीतून येणाऱ्या शहराचा गोंगाट —हे सगळं अमितच्या कानात घुमत होतं, पण त्याला त्यात काहीही समजत नव्हतं. डेस्कवर बसून तो कामात इतका गुंतला होता की त्याच्या फोनवर चमकलेले नाव त्याच्या मनात जरी आलं, तरी त्याने विचार केला, “आई नक्की काही छोटे काम सांगत असेल, नंतर कॉल करतो,” आणि फोन साइलेंट...

न झालेली भेट

Image
  संध्याकाळची वेळ झाली होती, ऑफिसमधून बाहेर पडण्याची वेळ झाली होती. घड्याळ पाहिले तर सात वाजले होते. रोजच्या सारख्या धावपळीच्या दिवसानंतर घरी जाण्याची वेळ झाली होती. मी मोबाइल उचलून पाहिले आज बायकोचा मेसेज आलेला नव्हता. “चला, आज काम संपलंय, घरी जाऊन थोडं विश्रांती घेऊ,” असा विचार मनात आला.. पाऊस पडायचा अंदाज होता, म्हणून आता लगेच निघायला हवं!. मी बॅग घेतली आणि खाली पार्किंगकडे निघालो. जिथे नेहमी माझी बाइक लावलेली असते, आज ती जागा रिकामी होती. दुसरी कोणतीही बाइक तिथे नव्हती. थोडा शोध घेतला, पण काहीच दिसले नाही. मग दिसली बाइक एका कोपऱ्यात. मग मी गेला आणि बाइक घेतलीआणि संध्याकाळच्या थंड हवेत रस्ता पकडला. वातावरण ताजेतवाने आणि थंडसर होतं; हलक्या थेंबांनी ओलेले रस्ते, वारा, थोडं सावल्या आणि हलकासा धुकं सगळं नैसर्गिकचं शांततेत झुलत होतं.रस्त्यावर पाहिलं, एक भाजीवाला गरम-गरम भजी काढत होता. वा वा! या वातावरणात गरम भजी तर नक्कीच पाहिजे. घरी गेल्यावर बायकोला सांगितलं, “आज गरम भजी कर!” रस्त्यात थोडं पुढे गेल्यावर रोजच्या ट्रॅफिकमध्ये अडकून थोड्या अंतरावर आलो. अचानक जोरात पाऊस सुरू झाला...